Hi Chaal Turu Turu

ALBUM: Kavi Gaurav Shanta Shelke
SINGER: Jaywant Kulkarni
MUSIC: Devdatta Sable
LYRICS: Shanta Shelke

₹ 0.00 0.0 INR ₹ 0.00

₹ 0.00

    This combination does not exist.


    हि चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू
    डाव्या डोळ्यावर बट ढळली
    जशी मावळत्या उन्हात
    केवड्याच्या वनात, नागीन सळसळली

    हि चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू
    डाव्या डोळ्यावर बट ढळली
    जशी मावळत्या उन्हात
    केवड्याच्या वनात, नागीन सळसळली

    इथं कुणी आसपास ना
    डोळ्यांच्या कोनात हास ना
    तू जरा माझ्याशी बोल ना
    ओठांची मोहोर खोल ना

    तू लगबग जाता, माग वळून पहाता
    वाट पावलात अडखळली
    जशी मावळत्या उन्हात
    केवड्याच्या वनात, नागीन सळसळली

    उगाच भुवई ताणूनं
    उगाचा रुसवा आणूनं
    पदर चाचपून हातानं
    ओठ जरा दाबीशी दातानं

    हा राग जीवघेणा, खोटा खोटा ग बहाणा
    आता माझी मला खूण कळली
    जशी मावळत्या उन्हात
    केवड्याच्या वनात, नागीन सळसळली

    हि चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू
    डाव्या डोळ्यावर बट ढळली
    जशी मावळत्या उन्हात
    केवड्याच्या वनात, नागीन सळसळली